नाशिक – नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षांच्या बागांची खा. डॉ. भारती पवार यांनी केली. यावेळी त्यांनी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असून या नुकसानग्रस्त द्राक्ष ,गहू व अन्य पिकांचे नुसते पंचनामेच न करता त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
जिल्हाभरातील अनेक तालुक्यांसह निफाड तालुक्यातील चितेगाव ,वरेदारणा,चांदोरी पंचक्रोशीतील अनेक द्राक्षबागांचे व अन्यपिकांचे वादळ व अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तसेच चांदोरी येथील शोभा अंबादास गोराडे यांच्या शेतातील ऊस हा शॉट सर्किट मुळे जळून त्यांचेही मोठे नुकसान झाले आले. त्याचाही पंचनामा करण्याच्या सूचना खा डॉ भारती पवार यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्या प्रसंगी निफाड भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ. डॉ सारीकाताई डेरले, भाजपा नेते जगन आप्पा कुठे, MSEB चे मोरे साहेब, युवा भाजपा नेते आदेश सानप, डॉ मनोज भुतडा, रवी सानप, डॉ विजय डेरले, संदीप टरले, उमेश नागरे, समर्थ बोरस्ते, धनाजी नाठे, तानाजी नाठे, भगवान गोराडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.