नाशिक – आरोग्यधाम व निसर्गोपचार केंद्र नाशिक रोड येथे १२ डिसेंबर २०२० पासून ३० जानेवारी २०२१ पर्यंत २४ साधक योगविद्या गुरुकुलचे योगशिक्षक पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास करत होते. त्यानंतर हे साधन ३१ जानेवारी २०२१ ते ७ फेब्रुवरी २०२१ पर्यंत निवासी शिबिरासाठी योगधाम गुरुकुल तळवडे, त्रंबकेश्वर, नाशिक येथे गेले होते. हे निवासी शिबिर ही या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. या सर्व साधकांनी हे निवासी शिबिर ऋषीधर्म ज्योती विश्वास मंडलिक व गुरुमाता सौ. पूर्णीमा ताई मंडलिक व अनंत वाडी सर यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पाडले.
७ फेब्रुवारी रोजी या सर्व साधकांचा समारोप समारंभ योग विद्या गुरुकुल, तळवडे येथे पार पडला. त्यासाठी पंतप्रधान पुरस्कार २०१८ चे विश्वास मंडलिक गुरुजी, गुरुमाता सौ. पूर्णिमाताई, गांधार मंडलिक, अनंत वाडी, श्री व सौ अर्चना वाडी, प्रवीण देशपांडे सर, जाधव सर इत्यादी सर्व उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक साधकाच्या मनोगतात हे शिबिर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मनःशांतीसाठी व योगमय जीवनशैलीसाठी खूप उपयुक्त ठरणारे आहे. प्रत्येकाने हा अभ्यासक्रम करावाच असेही सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माधुरी देवरे यांनी केले. आरोग्यधाम व निसर्गोपचार केंद्र, नाशिक रोड,हे नाशिकरोड करांसाठी वरदानच ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.