नाशिक – राज्य सरकारने धार्मिक स्थळ दर्शनासाठी खुली करण्याची घोषणा करताच, सातपूर कॉलनी आनंद छाया येथील साई बाबा मंदिरात मनसेचे नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे यांनी महाआरती करत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी मनसेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश निगळ, शहर सचिव अंबादास आहिरे, राजेश खताळे, वैभव महिरे, सचिन सिन्हा आदींसह साई भक्त उपास्थित होते.