नाशिक – नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेतर्फे महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा यांची चौथ्यांदा निवड झाली तसेच नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांची नाशिक मर्चन्ट को-ऑप बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या निमित्ताने नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य एकनाथ अमृतकर यांनी मंडलेचा यांचे सातत्याने मार्गदर्शन संघटनेस मिळत असल्याचे सांगितले.यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण जातेगावकर, शेखर दशपुते, सचिव चंद्रकांत दीक्षित, सुरेश मंत्री, संतोष रॉय, विजय काकड, हेमचंद्र पांडे, प्रभाकर गाडे, अशोक सोनजे , भिकूलाल कोठावदे आदी उपस्थित होते.