नाशिक – शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणा-या चार जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय राजेंद्र साळुंके, (रा. क्रांती नगर), मयूर उर्फ मट्या किरण पगारे (रा. भिमवाडी), अक्षय वीरसिंग वाघेरे (रा. क्रां तीनगर) व सुरजकुमार रवींद्र राय (रा. क्रांतीनगर) अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सागर रवींद्र (रा. रामवाडी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मेन रोड येथे फिर्यादी सागर व त्याचा मित्र लखन देवरे बसलेले होते. यावेळी संशयित अक्षय सांळुके, मयूर पगारे, अक्षय वाघेरे व सुरज राय हे तेथे आले. व हातात धारदार कोयता घेवून फिर्यादी व त्याच्या मित्रास ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून पोलीस उपनिरिक्षक कोल्हे तपास करत आहे.
………
दारुच्या नशेत दुकानदारास दुकान बंद करण्याची धमकी व हल्ला
नाशिक – दारुच्या नशेत दुकानदारास दुकान बंद करण्याची धमकी देत कोयत्याने हल्ला करून दुखापत केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभी धनराज चांदणे (रा. देवळाली गाव) असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी राकेश बाळू शिंदे (रा. देवळाली गाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी फिर्यादी राकेश शिंदे हे त्यांच्या दुकानावर काम करत असताना संशयित अभी चांदणे हा दारुच्या नशेत हातात कोयता घेवून तेथे आला व आरडाओरड करून दुकान बंद करण्यास सांगीतले. तसेच कोयत्याने त्याने फिर्यादी राकेश यांच्यावर हल्ला करत हातावर दुखापत केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.