नाशिक – फर्मच्या बँक खात्यावर भामट्यांनी डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत दोन महिलांच्या बँक खात्यात दीड लाखांची रोकड परस्पर वर्ग करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावित्री देवी आणि शिला कुमारी (पूर्ण नाव पत्ता नाही) याप्रकरणी निशीकांत गिते (रा.हॉटेल सिबल मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. गिते यांची व्यावसायीक फर्म असून, या संस्थेचे व्यवहार देना बँकेत आहेत. दिवाळी निमित्त फर्मचे कार्या लय बंद असल्याची संधी साधत सायबर चोरट्यांनी गिते यांच्या संस्थेचे बँक खाते हॅक केले. तसेच वरिल संशयीत महिलांच्या नावे असलेल्या बनावट बँक खात्यात १ लाख ४९ हजार ५२७ रूपयांची रोकड वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे. गिते यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.