नाशिक – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात स्वच्छता पंधरवाड्यास सुरुवात झाली. येथील वॉर्ड क्रं.१ मधील डेव्हलपमेंट एरियात या स्वच्छता पंधरवाडा मोहिमेचा सुरुवात करण्यात आली आहे.पुढील पंधरा दिवस ही मोहीम आठही वॉर्डात राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या प्रारंभ करताना उपाध्यक्ष सचिन ठाकरे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता मोहिम महत्त्वाची असून नागरिकांनी या मोहिमेत आपला सहभाग वाढविणे गरजेचे आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थाने स्वच्छ व सुंदर देवळाली साकार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेला सुरुवात भाऊसाहेब धिवरे,अॅड.राजीव भालेराव,विजय पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब धिवरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,या पंधरा दिवस चालणाऱ्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या स्वच्छता अभियानासाठी आरोग्य अधीक्षक रजिंदर सिंह ठाकुर, सहाय्यक निरीक्षक अमन गुप्ता,अतुल मुंडे यांच्यासह धीरज डुलगज,सोमनाथ कडभाने यांसह आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील आहेत.