नाशिक – नाशिककरांना प्रचंड प्रतिक्षा असलेली नाशिक-दिल्ली ही विमानसेवा येत्या २० नोव्हेंबर पासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. स्पाईसजेट या आघाडीच्या कंपनीने ही सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिकहून दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठीची सेवा सुरू करण्याचे पत्र कंपनीने हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला दिले आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला आहे. जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली ही यशस्वी विमानसेवा ठप्प झाल्यानंतर आता पुन्हा ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक हे राजधानी दिल्लीशी हवाई मार्गे जोडले जाणार आहे.
कंपनीने दिलेले पत्र असे