नाशिक- ब्रह्मlकुमारी परिवारात ईश्वरीय ज्ञानाचे माध्यम बनवून वयाच्या ९३ वर्षे पर्यंत सतत सेवा करून सोबत आपल्या अध्यात्मिक बलाने इतरांचे सुद्धा दुःख क्लेश मिटवून विश्वाची दादि समजल्या जाणाऱ्या दादि हृदयमोहिनीजी यांच्या अस्थी विसर्जन नाशिकमध्ये रामकुंडावर भावपूर्ण वातावरणात झाले. कोरोना सारख्या काळात आपल्याला दादिजींच्या अंत्यविधी कार्यात आबूला जाता आले नाही. मात्र आज अस्थी विसर्जनाच्या निमित्ताने दादिजींना नाशिक मध्येच प्रत्यक्ष भेटण्याचा आभास होत असल्याचे ब्रह्माकुमारी वासंतीदिजी यांनी यावेळी सांगितले. त्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका पदावरील वरिष्ठ दादीं हृदयमोहिनीजी यांचे अस्थी विसर्जन कार्य प्रसंगी शोक भावना प्रकट करतांना बोलत होत्या.
११ मार्च रोजी वरिष्ठ दादीं हृदयमोहिनीजी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर १३ मार्च रोजी माउंट आबू मुख्यालयातील शांतीवन परिसरात हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या अस्थींचे विसर्जन भारतातील प्रमुख तीर्थ स्थानांवर करण्यात येत आहे. २९ मार्च रोजी नाशिक पुण्यनगरीतील रामकुंड तीर्थक्षेत्रावर सकाळी मोजक्या साधकांच्या उपस्थित व प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमानुसार शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या प्रसंगी अखिल भारतीय पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने दादीजी यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
या कार्यासाठी माउंट आबू येथून विशेष पथक, दादिजींचा अस्थी कलश घेऊन उपस्थीत होते. सोबत सुरत, मुंबई येथून सुद्धा साधक आवर्जून उपस्थितीत होते. शहरातील समर्पित ब्रह्माकुमारी भगिनी व मोजक्या साधकांच्या उपस्थितीत प्रशासनाने घालून दिलेल्या सोशल डीस्टसिंग नियमांचे पालन करून अस्थी विसर्जन पार पडला.