नाशिक : दहा मिनिटांच्या वेळेत ठराविक अंतरावर असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या अज्ञात भामट्याने चोरून नेल्या. याप्रकरणी याप्रकरणी सरिता राजेंद्र बडगुजर (रा. पवननगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या रविवारी (दि. १४) रात्री आठच्या सुमारास फिर्यादी सरिता बडगुजर या पवननगर पाण्याच्या टाकीसमोरून जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात भामट्याने बडगुजर यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची २० हजार रुपये किंमतीची पोत ओरबाडून नेली. तसेच पुढे काही अंतरावर जावून पल्लवी कुलकर्णी यांच्या गळ्यातील गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन ओरबाडत पळ काढला. दहा मिनिटांच्या वेळेत चोरट्याने दोन महिलांच्या गळ्यातील दागीने ओरबाडून नेल्याने परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करत आहे.
——-
गळफास घेवून आत्महत्या
नाशिक : ओढणीच्या सहायाने महिलेने सिलींग फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली. पुजा विलास तांबोळी (रा. बडदे नगर) असे आत्महत्या करणाºया महिलेचे नाव असून घटनेचे कारण समजू शकले नाही. शनिवारी (दि. १३) सकाळी साडेआठच्या सुमारास पुजा यांनी राहत्या घरातील बेडरुमध्ये असलेल्या सिलींग फॅनला ओढणीच्या सहायाने गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.