नाशिक – कोरोनाचा वाढता आलेख बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा विचार करता दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.गौरव भानुदास गोवर्धने यांनी केले आहे. त्यांनी शिक्षणमंत्री यांना ई – मेल सुध्दा पाठवला आहे.
या मेलमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली असून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शाळा व महाविद्यालय बंद करून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण घेतले गेले. परंतु दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन घेण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा विचार करता दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी