त्र्यंबकेश्वर – एसटी महामंडळाने नाशिक शहराला काही महत्त्वाच्या तालुक्यांसाठी बससेवा सुरू केली आहे. आता इतर जिल्ह्यांसाठीची सेवाही सुरू होत आहे. मात्र, अद्यापही नाशिक-त्र्यंबकेश्वर ही बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक अडचणींना त्र्यंबकवासियांना तोंड द्यावे लागत आहे. ही बससेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून एसटी बससेवेकडे पाहिले जाते. त्र्यंबक शहर आणि ग्रामिण भागातील जनतेला विविध शासकीय कामांसाठी,औषधोपचार, जिवनावश्यक वस्तूंची खरेदी आदींसाठी नागरिकांना नाशिकला यावे लागते. मात्र, बससेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. नाशिक-त्र्यंबक मार्गावरील २० ते २५ गावांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
—
नाशिक-त्र्यंबक बस फेरी सुरू करावी. ग्रामिण भाग आणि त्र्यंबकेश्वर यांना जोडणारी बस सेवा मिळावी. पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र दिले आहे.
- बहिरू पाटील-मुळाणे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी