त्र्यंबकेश्वर – नाशिक ते त्र्यंबक बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच या मार्गावरील बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र पेंडोळे यांनी बस स्थानकावर भेट देऊन चालक व वाहक यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. पेंडोळे यांनी त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त प्रवांशाना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. नाशिक-त्र्यंबक बसच्या फे-या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी वाहतूक नियंत्रक यांच्याकडे नोंदवली आहे. सफाळे-नंदूरबार, जव्हार–नाशिक या पालघर जिल्ह्यातील बस देखील सुरू झाल्या आहेत. बसेवेचा अधिकाधिक लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील बस सुरू करण्याची मागणी आता पुढे येत आहे. सार्वजनिक वाहतुकीचे ते एकमेव सक्षम साधन आहे. त्याअभावी नागरिकांना अनेक बाबींना तोंड द्यावे लागत आहे. ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष अमर सोनवणे, वाहतुक नियंत्रक बी.आर.साळवे, चालक रमेश गायकवाड, वाहक अजय राजगिरे, प्रवासी नितीन सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते.
नियमांचे पालन
प्रत्येक बस मध्ये केवळ २२ प्रवाशांनाच परवानगी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नसल्याचे यावेळेस अवर्जून सांगण्यात आले. नागरिकांमध्ये याबाबत संभ्रमावस्था असल्याने ती दूर व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.