नाशिक – तालुक्यातील २१४४ सहकारी गृहनिर्माण संस्था या माहे २० अखेर अवसायनात होत्या. त्यापैकी आज अखेर ११५ सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्जिवीत झालेल्या आहेत. उर्वरीत संस्थापैकी ६२३ गृहनिर्माण संस्थांचा पत्रव्यवहाराचा पत्ता हा संस्था नोंदणी करत्या वेळीचा असल्याने त्या संस्था त्या पत्यावर आढळून येत नसल्याची बाब समोर आली आहे.
उत्तर महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष वसंतराव तोरवणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अवसायनातील व इतर गृहनिर्माण संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. उपनिबंधक, सहकारी संस्था, उर्दु षाळेजवळ मदीना चौक, नाशिक येथील हौसिंग कक्षातील राजेश सानप- मो.नं.9511145641, सौ.स्वप्नाली षिंदे, स्वप्नील जगताप, मो.नं.9158288987 व कार्यालयाचा दुरध्वनी क्र.0253-2508222 व कार्यालयीन वेळेत संपर्क साधून संस्था अवसायनात आहे किंवा नाही याबाबतची खात्री करून घ्यावी.
अवसायकाच्या संपर्कासाठी त्याचे नाव पत्ता व दूरध्वनी क्रमांक घेऊन त्याचा मार्फत पुनर्जिवनाचा प्रस्ताव आणि अहवाल उपनिबंधक कार्यालयात तात्काळ सादर करावा. तसेच, ज्या संस्थाचे लेखापरीक्षण व निवडणुका झालेल्या नाहीत तसेच सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार ज्या संस्थाचे कामकाज करत नाही अथवा बंद आहे, अशा संस्थांची नोंदणी रदद् करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
ज्या संस्थांशी अवसायक याचा संपर्क झाला असून संस्थेने अवसायक यांना संस्थेचा पदभार दिलेला नाही अशा संस्था चालकांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 नुसार कलम 80 अन्वये संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबाबतचा निर्णय उपनिबंधक घेणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
गृहनिर्माण संस्थेची नोंदणी रदद् झाल्यास सातबारा उताऱ्यावर कब्जेदार सदरी संस्थेचे नाव राहणार नाही. त्यामुळे संस्थेच्या मालमत्तेचे टायटल मध्ये दोष निर्माण होईल. (टायटल डिफेक्टिव्ह होईल). त्यामुळे संस्थाचा पुनर्विकास करता येणार नाही तसेच पुनर्विकासाचा लाभ देखील मिळणार नाही तसेच संस्थेचे कामकाज एकसुत्री राहणार नाही, संस्थेच्या इमारतीचा देखभाल करण्यासाठी जमा-खर्चाच्या हिशेबाबाबत सदनिका धारकांच्या दरम्यान आरोप, प्रत्यारोप वादविवाद वाढतील तसेच, न्यायालयीन प्रकरणे देखील वाढतील इत्यादी नुकसानकारक बाबी असल्याने संस्था पुनर्जिवीत करणे हिताचे होईल, असे तोरवणे यांनी सांगितले आहे.