नाशिक – समाजाला दिशा देत मार्गदर्शन करण्याचे काम पत्रकारांच्या माध्यमातून होत असते अशा पत्रकारांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांचा नाशिक तालुका पत्रकार संघाकडून केला जाणारा गौरव कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप यांनी केले. यावेळी पत्रकार, सामाजिक संस्था, कोव्हीड हॉस्पिटल, ग्रामपंचायत, कला व क्रीडा क्षेत्रातील ४४ जणांचा कार्यगौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.
देवळालीतील डॉ.गुजर सुभाष हायस्कुलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर होते. तर प्रमूख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबन घोलप, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार,माजी आमदार योगेश घोलप, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे ,शंकर एजुकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, भगूर नगराध्यक्षा अनिता करंजकर, पंचायत समिती सभापती विजया कांडेकर, रत्नाकर चुंभळे, मनपा नगरसेवक केशव पोराजे,विशाल संगमनेरे, व्यापारी बँक जनसंपर्क संचालक अरुण जाधव,तालुका पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे, विक्रम कोठुळे, अभिनेत्री रुपाली गायखे, नितीन चिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पां.भा.करंजकर यांनी पत्रकारितेतील बदलाबाबत सविस्तर विवेचन केले तर यशवंत पवार यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.तर रतन चावला यांनी समाजाचे प्रतिबिंब पत्रकार लेखणीद्वारे समाजात उमटविण्याचे काम करीत आहे. सचिन ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांची भूमिका लोकशाहीमध्ये महत्वाची असल्याचे सांगितले. तसेच माजी आमदार योगेश घोलप,विजया कांडेकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
सत्काराला प्रातिनिधिक स्वरूपात रुपाली गायखे व मनीषा चौधरी यांनी उत्तर देतांना पत्रकार संघाला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुधाकर गोडसे व सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी तर आभार अरुण बिडवे यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रकाश टाकेकर,सुनिल पवार, दिनेशपंत ठोंबरे, प्रमोद राहणे,अरुण तुपे, हरीश बोराडे, दिपक कणसे, प्रशांत धिवंदे, नंदकुमार शेळके, गोकुळ लोखंडे,संजय निकम, मंगलसिंग राणे,सुभाष कांडेकर,वसंत कहांडळ,भास्कर सोनवणे,प्रमोद मोजाड, राम धोंगडे,राम पानसरे आदी प्रयत्नशील होते.
यांचा झाला सन्मान
इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर तर प्रिंट मिडियासाठी प्रवीण बिडवे, दिगंबर शहाणे, देवयानी सोनार, वाल्मिक शिरसाठ,शरदचंद्र खैरनार अमोल यादव, चंदन खतेले, हरिभाऊ सोनवणे, सुशांत किरवे, तुषार जगताप, राजेश जाधव , सिद्धांत कोठुळे,अजय उन्हवणे, संतोष भावसार , प्रवीण नेटावणे, भास्कर सोनवणे, रवी पाटील ,रवींद्र जाधव,विलास पवार, सुनील मगर,सुकदेव काळे, धीरज मांडे, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, योगाचार्य उल्हास कुलकर्णी सायकलिस्ट ग्रुप, अनुज बहुद्देशीय सेवा संस्था, बिटको हॉस्पिटल, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, डॉ.वसंतराव पवार हॉस्पिटल, एसएमबीटी हॉस्पिटल, सुसाराज आचारी, डॉ.मंगेश सोनवणे, कृष्णा गरड, शिवानी गायकवाड, पूनम गायधनी,रुपाली गायखे, तन्मयी जोगळेकर, महेश खैरनार यांसह कोटमगाव, संसरी, इंदिरानगर (गाळोशी), ओढा व स्वच्छतेसाठी भगूर नगरपालिका आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.