नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर आणि जिल्हयातू दोन वषार्साठी तडीपार केलेले असतांना राजरोसपणे शहरात वावरणा-या एका गावगुंडास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जुनी स्टेशनवाडी भागात केली. संशयीतास देवळाली कॅम्प पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
सागर – मुन्ना उर्फ मनोहर सोळंकी (३० रा.हनुमान मंदिराजवळ,जुनी स्टेशनवाडी दे.कॅम्प) असे अटक केलेल्या तडीपार संशयीताचे नाव आहे. युनिटचे शिपाई योगेश सानप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीतास शुक्रवारी (दि.१८)सायंकाळी बेड्या ठोकण्यात आल्या. संशयीत तडीपार आपल्या घर परिसरात राजरोसपणे वावरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक अभिजीत सोनवणे, हवालदार रमेश घडवजे,पोलीस नाईक मोतीलाल महाजन, शिपाई संतोश माळोदे, बाळासाहेब नांद्रे,योगेश सानप,यादव डंबाळे,गौरव गवळी व कोमल यादव आदींच्या पथकाने सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयीतास देवळाली कॅम्प पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.