ठक्कर बाजार येथून दुचाकी चोरी
नाशिक : पार्किंग मध्ये लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश बळीराम वरूडे (रा.लोटस कॅसल,कामटवाडे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वरूडे गेल्या शनिवारी (दि.२०) कामानिमित्त ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात आले होते. मनसे कार्यालया जवळ एमएच १५ सीयू ५७९३ दुचाकी पार्क करून ते वकिलांकडे गेले असता ही घटना घडली. काम आटोपून दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी ते आले असता ही घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलचे लॉक तोडून पळवून नेली. अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.
….
अतिरक्तश्रावाने महिलेचा मृत्यु
नाशिक : बाळंतपणात अतिरक्तश्राव झाल्याने औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या २६ वर्षीय विवाहीतेचा मृत्यु झाला. महिलेस उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रेखा मिलींद घालमे (रा.शिवाजीनगर सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. रेखा घालमे यांची १४ जानेवारी रोजी मायको हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली होती. बाळंतपणात अतिरक्तश्राव झाल्याने तिला तातडीने परेल (मुंबई) येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतांना ४ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यु झाला. भोईवाडा पोलीस ठाण्यातून हा प्रकार सातपूर पोलीस ठाण्यात वर्ग झाला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.