नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी चालक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १ हजार चालकांना अल्पोपहार, मास्क, सॅनिटायझरसह आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आज द्वारका, आडगाव ट्रक टर्मिनल, सिन्नर फाटा, ओझर, पिंपळगाव बसवंत या विविध ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करत चालक दिन साजरा करण्यात आला.
दि.१७ सप्टेंबर हा देशभर चालकदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गेल्या आठ वर्षांपासून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांचा सन्मान करून त्यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाच्या वर्षी मात्र देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे एकत्रित येत चालक दिन साजरा करता येणे शक्य नसल्याने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करत चालक दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे चालकांच्या आरोग्याचा विचार करून एक हजार चालकांना मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पी.एम.सैनी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जागडा, दिलीपसिंग बेनिवाल, महेंद्रसिंग राजपूत, गणेश नगरे, तेजपालसिंग सोढा, राजेश शर्मा, विशाल पाठक, संदीप बिर्ला, सुनील ढाणे, सदाशिव पवार, बाळासाहेब घोटेकर, सतीश कलंत्री, रामू अण्णा, दीपक शुक्ल आदी उपस्थित होते.