नाशिक : दगड मारून काचा फोडण्याचा धाक दाखवत ट्रक थांबवून चालकास दोघा जणांनी लुटले. याप्रकरणी सिराजउद्दीन अलीहुसेन खान (रा. भिवंडी, ठाणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व अन्य एक जण संशयित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १) रात्री एक वाजता फिर्यादी सिराजउद्दीन खान व राजू यादव हे दोघे जण ट्रक क्र. (एमएच ४८ बीएस ०३३०) मधून काच बनवण्यासाठीचा कच्चा माल घेवून बलसाड (गुजरात) कडून सिन्नरकडे जात होते. सोमवारी रात्री एकच्या सुमारास टाकळी गावाजवळ गोदावरी पुल ओलांडला असता दोन जणांनी हातात दगड घेवून काचेवर मारण्याचा धाक दाखवत ट्रक थांबवला व ‘एन्ट्री निकाल’ असे म्हणत फिर्यादीकडून १०० व राजू यादव यांच्याकडून ५०० असे एकूण ६०० रुपये जबरदस्ती काढून घेत मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहे.
नाशिक : शहरातून दोन मोटारसायकलींसह एक सायकल चोरीला गेली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना कौशल्या नगर, रामवाडी परिसरात घडली. याप्रकरणी हेमंत हिरालाल तांबट (रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी हेमंत तांबट यांची मोटारसायलक क्र. (एमएच १५ जीएन ७११९) शरण सोसायटी पाण्याच्या टाकीजवळ पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किंमतीची ही मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी पोलीस नाईक वाय. डी. देवरे तपास करत आहे.
दुस-या घटनेप्रकरणी शरद देवराम मानकर (रा. जयप्रकाश नगर, सिन्नर फाटा) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. मानकर यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ डीएफ ७९६९) राहत्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तिस-या घटनेत सविता संजय शिंदे (रा. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ, जेलरोड) यांची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ जानेवारीला शिंदे यांच्या मुलाने १० हजार रुपये किंमतीची सायकल राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
———-
गळफास घेत दोघांची, औषध घेवून एकाची आत्महत्या
नाशिक : विविध कारणांतून शहरात तीन जणांनी आत्महत्या केल्या. दोन जणांनी गळफास घेत तर एकाने विषारी औषध सेवन करून जीवन संपवले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना मोतीवाला कॉलेज परिसरात घडली. येथील श्याम कुवरलाल लिव्हारे (वय ३२, रा. मिथील प्राईड, धु्रवनगर) याने सोमवारी (दि. १) सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात कारणातून लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेतला. नवनाथ प्रभाकर सांगळे यांनी गंगापूर पोलिसांना घटनेची खबर दिली. याप्रकरणी पोलीस नाईक आर. के. झिरवाळ तपास करत आहे.
दुसरी घटना गांधीनगर पाण्याच्या टाकीजवळ घडली. येथील मिरा रामा भाटी सोमवारी (दि. १) दुपारी राहत्या झोपडीत अज्ञात कारणातून गळफास घेतला. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी पोलीस शिपाई शेख यांनी उपनगर पोलिसांना खबर दिली.
तिस-या घटनेत पुंजा गोविंद आडके (वय ७५, रा. नानेगाव) यांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. १) दुपारी अडीचच्या सुमारास आडके यांनी अज्ञात कारणातून विषारी औषध घेतले. उपचारासाठी त्यांना सुरवातीला बिटको आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राहूल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस शिपाई मसदे यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना खबर दिली असून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.