नाशिक – संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित २ मार्च मंदिर प्रवेश संग्राम दिनानिमित्त जेलरोड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी २ मार्च १९३० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मदिर प्रवेशाचा यशस्वी लढा कसा दिला याची आठवण आपल्या भाषणातून करून दिली. माजी नगरसेवक गणेशभाई उन्हवणे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, आणि जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांनी नागरिकांना संबोधन केले. तसेच २५ आणि २६ मार्च रोजी नाशिक मधील म.वि.प्र केटीएचएम कॉलेज येथे होणाऱ्या सविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी रवी पगारे, आदी उपस्थित होते.