जुन्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला
नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळा नाका भागात घडली. या घटनेत युवकावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तीन संशयीतांना अटक केली आहे.
झिशान शेख शब्बीर उर्फ दानिश (२६ रा.इगतपुरी चाळ,द्वारका),नाझीम इकबाल मन्सुरी (२८ रा.नानावली) व शोएब कलीम शेख (२४ रा.चौकमंडई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून जुबेर शेख नामक त्यांचा साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी परवेज फिरोज खान (२४ रा.नागसेननगर,वडाळागाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. परवेज खान बुधवारी (दि.७) वडाळानाका येथील नजमी बोहरी दुकानाबाहेर उभा असतांना परिचीत असलेल्या संशयीतांनी त्यास गाठले. यावेळी संशयीत झिशान शेख याच्या समवेत पाच वर्षापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून टोळक्याने परवेज खान यास शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर संतप्त झिशान शेख याने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने वार केले. या घटनेत परवेज खान जखमी झाला असून अधिक तपास निरीक्षक अहिरे करीत आहेत.
……..