नाशिक : जुन्या वादाच्या कारणातून टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिंडोरीरोड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसानी तीघा संशयीतांना बेड्या ठोकल्या आहेत.
सोमनाथ शिवाजी गवारे (३९),संतोष शिवाजी गवारे (३०) व सुरज उर्फ सुनिल दत्तू गवारे (२० रा.तीघे वडनगर,दिंडोरीरोड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून सागर दत्तू गवारे हा युवक अद्याप फरार आहे. याप्रकरणी सचिन बबन राक्षे (३० रा.वडनगर) याने तक्रार दाखल केली आहे. संशयीत टोळक्याने रविवारी (दि.७) रात्री राक्षे याच्या भावास महालक्ष्मी भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक वाचनालया जवळ गाठून जुन्या भांडणाच्या कारणातून वाद घालता. यावेळी संतप्त टोळक्याने राक्षे यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून दगड विटांनी बेदम मारहाण केली. यावेठी ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
…….
भरधाव कारने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु
नाशिक : उड्डाणपूलावर रस्ता ओलांडत असतांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. हा अपघात महामार्गावरील पाथर्डी फाटा परिसरात झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कचरू बाळू आरसाड (५५ रा.सिंहस्थनगर,सिडको) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. कचरू आरसाड रविवारी (दि.७) रात्री सिडको बाजू कडून हॉटेल हेवन सेवनच्या दिशेने उड्डाणपूलावर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. सोनाली मटन भाकरी हॉटेल कडून ते पायी जात असतांना महामार्गावर नाशिककडून मुंबईच्या दिशने भरधाव जाणा-या अज्ञात कारने त्यांना धडक दिली. या अपघातात आरसाड गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुलगा समाधान आरसाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
…
६० वर्षीय वृध्दाने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : शांतीनिकेतन कॉलनीत राहणा-या ६० वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठोबा उध्दव आवस्कर (रा.सभागृहा मागे,मनपा गार्डन जवळ) असे आत्महत्या करणा-या वृध्दाचे नाव आहे. आवस्कर यांनी सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीस नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी शिवगंगा साबळे यांनी खबर दिल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
……………
बेकायदा दारू विक्री करणा-या दोघांनना पोलीसांनी घेतले ताब्यात
नाशिक : शहरात वेगवेगळय़ा भागात बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आलेल्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर दिलीप उंबरे (रा.काळे मामा गिरणी मागे, पंडीतनगर,मोरवाडी) व कोंडाजी आण्णा जाधव (५५ रा.लक्ष्मणनगर,तेलंगवाडी,फुलेनगर) अशी मद्यविक्री प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहे. सागर उंबरे हा आपल्या घरात बेकायदा मद्य विक्री करीत असल्याची माहिती अंबड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.७) रात्री पोलीसांनी छापा टाकला असता तो मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तुळशीराम जाधव या पोलीस कर्मचा-याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भालेराव करीत आहेत. दुसरी कारवाई पंचवटीत करण्यात आली. तेलंगवाडीतील कोंडाजी जाधव हा बेकायदा मद्यविक्री करीत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. सोमवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास पोलीसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता तो मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे साडे पाच हजार रूपये किमतीचा टँगो पंच या देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी विलास चारोस्कर या पोलीस कर्मचा-याच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सानप करीत आहेत.