मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाला टोळक्याने केली बेदम मारहाण

by India Darpan
जानेवारी 2, 2021 | 9:34 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


टोळक्याकडून दोघांना मारहाण
नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढून तरूणासह त्याच्या मित्राच्या वडिलांनी टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सिध्दार्थनगर येथील रेल्वे फाटक भागात घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून याप्रकरणी चार जणांविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक गांगुर्डे,किशोर गांगुर्डे,भगवान सकट आणि गट्या (रा.सर्व गुलाबवाडी,देवळाली गाव) अशी मारहाण करणा-या टोळक्याची नावे आहेत. याप्रकरणी रोहित डेव्हीड गायकवाड (२२ रा.रमाबाई आंबेडकर नगरस गुलाबवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गायकवाड ३१ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मित्राचे वडिल दावीत पाटोळे यांच्या समवेत रेल्वे फाटका जवळून पायी जात असतांना ही घटना घडली. मित्र रोहित पाटोळे याच्या समवेत झालेल्या वादाची कुरापत काढून संतप्त टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. या घटनेत गट्या नामक युवकाने तक्रारदार तरूणाच्या लाकडी दांडका मारला तर अन्य कुणीतरी पाटोळे यांना वीट मारून फेकल्याने दोघे जखमी झाले असून या घटनेत जखमी युवकाच्या गळयातील चांदीची साखळी व मोबाईल खिशातून पडल्याने गहाळ झाला आहे. अधिक तपास जमादार ढोली करीत आहेत.

……..

वन विभागाच्या कार्यालयातून इलेक्ट्रीक मोटार चोरीला
नाशिक : त्र्यंबकरोडवरील वन विभागाच्या कार्यालयातून इलेक्ट्रीक मोटार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरूवारी (दि.३१) उघडकीस आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी गवांदे (रा.उत्तमनगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गवांदे वन विभागात कार्यरत असून विभागीय वन अधिकारी कार्यालय आवारातील मुल्यांकन विभाग परिसरात ठेवलेली दोन हॉर्स पॉवरची जलपरी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ३१ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अधिक तपास हवालदार गावित करीत आहेत.

…..

चक्कर येवून पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ३९ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. ही घटना प्रगती कॉलनीत घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राहूल सुर्यभान वाघ (रा.प्रगती कॉलनी,उपनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाघ शुक्रवारी (दि.१) दुपारच्या सुमारास आपल्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुन्तोंडे करीत आहेत.

…….
इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : सेंट्रींग काम करीत असतांना इमारतीवरून पडल्याने ३४ वर्षीय कामगाराची मृत्यु झाला. ही घटना हिरावाडी परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रामकिशोर बेनीमाधव यादव असे मृत कामगाराचे नाव आहे. यादव शुक्रवारी (दि.१) हिरावाडीतील गोकुळधाम सोसायटी या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करीत असतांना ही घटना घडली. सेंट्रीगचे काम करीत असतांना अचानक तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने अमृतलाल यादव यांनी जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोयत्याने धाक दाखवत तडीपारने लुटले तर दुस-या घटनेत तडीपार जेरबंद

Next Post

औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करा, मनसेचे पोस्टर आंदोलन

India Darpan

Next Post
12 1

औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करा, मनसेचे पोस्टर आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011