कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ पर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ९२३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ८ हजार ८६७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ११८, चांदवड ९७, सिन्नर १७१, दिंडोरी ७३, निफाड २५३, देवळा ५७, नांदगांव २३०, येवला ११४, त्र्यंबकेश्वर ५९, सुरगाणा ०६, पेठ ०३, कळवण २९, बागलाण ९५, इगतपुरी २६, मालेगांव ग्रामीण ७७ असे एकूण १ हजार ४०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ७३१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६६४ तर जिल्ह्याबाहेरील ६४ असे एकूण ८ हजार ८६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ९६६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४. १४ टक्के, नाशिक शहरात ९१.१७ टक्के, मालेगाव मध्ये ८६.३५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.०२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.८२ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ८६९ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८१ व जिल्हा बाहेरील ६० अशा एकूण २ हजार १७६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ३४ हजार ९६६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २३ हजार ९२३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.८२ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)