नाशिक – जिल्ह्यात शुक्रवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. जिल्ह्यात एकूण ६८१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची आजवरची संख्या १४ हजार १६ एवढी झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५८५ झाला आहे.
जिल्ह्यात सध्या ४ हजार ३४६ जणांवर उपचार सुरू आहेत. नाशिक शहरामध्ये ३ हजार ११५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर नाशिक ग्रामीणमध्ये ९९३ आणि मालेगाव शहरात २२६ जण उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेरील १२ जण नाशिकमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजवरचे एकूण कोरोनाबाधित १८ हजार ९४७ एवढे झाले आहेत.