मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात या ५ ठिकाणी होणार उद्या ड्राय रन

by India Darpan
जानेवारी 7, 2021 | 3:56 pm
in स्थानिक बातम्या
0
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक – कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उद्या  (८ जानेवारी) जिल्ह्यात ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय, सैय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगांव येथील आरोग्य केंद्र ही ठिकाणे ‘ड्राय रन’ साठी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड19 लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ नियोजनाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत हेाते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापु नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास, वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हलन्स मेडीकल ऑफीसर डॉ.प्रकाश नांदापुरकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, 8 जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ साठी निवड केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी 8 वाजता व कोविड-19 च्या ड्रायरनसाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सकाळी 9 वाजता नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. कोविड 19 ची ड्रायरन प्रक्रीया सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय, सैय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगांव येथील आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी एक नोडल अधिकारी व कर्मचारी यांची टीम बनविण्यात आली असून या टिमने ड्राय रन दरम्यान मास्क व ग्लोजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड 19 ड्रायरन लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या वेटींग रूममध्ये निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांला सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून प्रत्येक लाभार्थ्यांचे तापमान घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये CoWin aap या ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याची नोंद करण्यात येवून त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्यांनतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑबझरव्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला 30 मिनिट परिक्षणासाठी बसविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली आहे.
लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 135 शासकीय व 12 हजार 480 खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 29 लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्यााचत कोविड 19 लसीकरण मोहिमे अंतर्गत  लस साठविण्यासाठी 210 आयएलआर उपलब्ध असून यामध्ये एकावेळेस साधारण 11 लाख डोस साठविणची क्षमता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, ही नाशिकचीच महापालिका उद्याने आहेत! तुम्ही पाहिलीत का?

Next Post

औरंगाबाद नामांतरावर अखेर अजित पवार बोलले..

India Darpan

Next Post
Ajitdada 3

औरंगाबाद नामांतरावर अखेर अजित पवार बोलले..

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011