कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ पर्यंत
…
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १० हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २६३, चांदवड १११, सिन्नर १८७, दिंडोरी ७९, निफाड २७३, देवळा १०८, नांदगांव २८०, येवला १३७, त्र्यंबकेश्वर ८१, सुरगाणा ०८, पेठ ००, कळवण ४८, बागलाण १३६, इगतपुरी ५२, मालेगांव ग्रामीण १०१ असे एकूण १ हजार ८६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ८ हजार १७३ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७१६ तर जिल्ह्याबाहेरील ९८ असे एकूण १० हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ४६६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३. १२ टक्के, नाशिक शहरात ८९.७९ टक्के, मालेगाव मध्ये ८६.०७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.२७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.५८ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ८७४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८४ व जिल्हा बाहेरील ६१ अशा एकूण २ हजार १९३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ३८ हजार ४६६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २५ हजार ४२२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९० .५८ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)