नाशिक – महाराष्ट्र राज्य किसान सभा नाशिक जिल्ह्याची बैठक १२ डिसेंबर रोजी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनत १२ शेतकरी शहिद झालें त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. किसान सभा नेते जिल्हा उपाध्यक्ष शंकर गंभीरे (मनमाड) यांचे कोरोनाने निधन झाले आहे त्यांना आदरांजली वाहिली.
किसान सभेचे राज्यसचिव राजू देसले यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनची माहीत दिली. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी दिल्लीत शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे करून अडानी, अंबानी यांच्या सारख्या कॅार्पोरेटच्या हातात शेती उद्योग जाईल. प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० सुध्दा शेतकरी, ग्राहक विरोधी आहे. शेतकरी, घरगुती ग्राहकांना मिळणाऱ्या वीज सवलती काढून घेतल्या जातील. विजेचे खासगीकरण करून कामगारचा रोजगार जाणार आहे. या विरोधात दिल्लीत सुरू असलेले आंदोलन ला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांन पर्यन्त गावा गावात समजून सांगत संवाद करण्याची मोहीम १५ डिसेंबर पासून राज्यभर राबविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात १ लाख पत्रक वाटप करण्यात येणार आहेत. अन्नदाता शेतकऱ्यांना साथ द्या ही मोहीम सोशल मीडियावर राबविण्यात येणार आहे. यात नाशिक जिल्ह्या अग्रणी रहावा असे आवाहन केले. आयटक संलग्न कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन , समविचारी शेतकरी, युवक संघटना, संस्था, सोबत व्यापक मोहीम सुरू करावी असे आवाहन केले. यावेळी पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी किसान सभा जिल्हा पदाधिकारी अॅड दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, दशरथ कोतवाल, विजय दराडे, शिवाजी पगारे, प्रा आर भोंग, तलाहा शेख, नामदेव बोराडे, व्ही डी धनवटे, एस खतीब मधुकर मुठाल, भाऊसाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, शिवराम रसाळ,देविदास बोपळे, फैजन शेख, जगन माळी, अॅड. बी गोळेसर, नामदेव राक्षे, बशीर पठाण, प्रमोद आपसुंद, एकनाथ दौंड,आदी उपस्थित होते.