नाशिक – जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १ लाख ८८ हजार कोमोर्बिड रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना एकापेक्षा अधिक आजार आहेत. त्यामुळे या व्यक्तींना कोरोना काळात अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग यांनी कोविड -१९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम सुरू केला असून आरोग्य विभागाचे पथक शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक घरात तेथे राहणाऱ्या लोकांची नोंद घेण्यास गेले. तसेच जर त्या कुटुंबाला आरोग्याशी संबंधित काही त्रास होत असेल तर त्याचीही नोंद करण्यात आली. जिल्हा आरोग्य सर्वेक्षण पथकांनी नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे ४३ लाख ७ हजार कुटुंबांपैकी सुमारे ८ लाख ५६ हजार लाख जणांची माहिती दिली.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त कोमोरबिड रूग्ण उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते. तसेच आम्हाला आढळले की, तब्बल ६३ हजार ८०८ जण उच्च रक्तदाब ग्रस्त आहेत, तर १२ हजार ८७८ लठ्ठ आहेत. तसेच कर्करोगाने ग्रस्त ९९० जण असून २१ हजार ५०१ इतर जुनाट आजारांनी ग्रस्त आहेत. याशिवाय एकूण ९ हजार २१८ जणांना दम्याचा त्रास असल्याचे देखील आढळले.
सर्वेक्षण दरम्यान, कोविड -१९संबंधित पुढील निदानासाठी ४ हजार ५९५ हजार कॉमोर्बिड रूग्णांना विविध शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होण्यासाठी सांगण्यात आले. कोविड -१९ संसर्गाचा १०० हून अधिक रुग्ण पॉझेटिह आढळले. या सर्वेक्षणातून जिल्हाभरातील विविध रूग्ण शोधण्यात आम्हाला मदत झाली आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यापैकी फारच कमी लोकांना या गंभीर आजाराची लागण झाली होती. आरोग्य विभाग आता जिल्ह्यातील कोमोर्बिड रूग्णांकडे विशेष लक्ष देणार आहे. बागलाण तालुक्यात (२५५५) निफाड (२०६२) आणि दिंडोरी (२२८५) मध्ये सर्वाधिक कॉमोर्बिड रूग्ण नोंदले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.