कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ७८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २६ हजार ०५८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ३७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५२९, चांदवड ५८२, सिन्नर ५१०, दिंडोरी ४६४, निफाड १ हजार २५६, देवळा ९२४ , नांदगांव ८२९, येवला ६०२, त्र्यंबकेश्वर १४८, सुरगाणा ८५, पेठ ५२, कळवण २५३, बागलाण ९६०, इगतपुरी ३११, मालेगांव ग्रामीण ७४८ असे एकूण ८ हजार २५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५ हजार ९०८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७०२ तर जिल्ह्याबाहेरील १९० असे एकूण २६ हजार ०५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७८ हजार २१४ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८३.१८ टक्के, नाशिक शहरात ८४.८५ टक्के, मालेगाव मध्ये ७७.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.०५ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ९६० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २०३ व जिल्हा बाहेरील ६८ अशा एकूण २ हजार ३७४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ७८ हजार २१४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ४९ हजार ७८२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.०५ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)