कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १४१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४९३, चांदवड ५५७, सिन्नर ६३२, दिंडोरी ४१९, निफाड १ हजार १९५, देवळा ९५३ , नांदगांव १ हजार १५, येवला ५८३, त्र्यंबकेश्वर ९७, सुरगाणा ८३, पेठ ५३, कळवण २५३, बागलाण ८७८, इगतपुरी ३२४, मालेगांव ग्रामीण ६१३ असे एकूण ८ हजार १४८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५ हजार २३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५९५ तर जिल्ह्याबाहेरील २१४ असे एकूण २५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६८२ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८३.०० टक्के, नाशिक शहरात ८५.१८ टक्के, मालेगाव मध्ये ७८.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.४७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.२४ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ९५१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १९९ व जिल्हा बाहेरील ६८ अशा एकूण २ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ७४ हजार ६८२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ४७ हजार १४१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.२३ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)