कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार ३१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार २६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३२८, चांदवड ३७५, सिन्नर ३४६, दिंडोरी २६५, निफाड ८४४, देवळा ६५०, नांदगांव ७६५, येवला २५२, त्र्यंबकेश्वर ४१, सुरगाणा २२, पेठ २७, कळवण १५७, बागलाण ५८४, इगतपुरी २४९, मालेगांव ग्रामीण ४५७ असे एकूण ५ हजार ३६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार ४१७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २५७ तर जिल्ह्याबाहेरील २८६ असे एकूण १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ८९९ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८६.४५ टक्के, नाशिक शहरात ८७.५९ टक्के, मालेगाव मध्ये ८१.३१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.५३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६.८८ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ९०८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८७ व जिल्हा बाहेरील ६४ अशा एकूण २ हजार २६२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ५६ हजार ८९९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ३६ हजार ३१५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६ .८८ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)