कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ७६ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ८२३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ५५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६८३, चांदवड १ हजार ४०, सिन्नर ८२५, दिंडोरी ६११, निफाड १ हजार ९६७, देवळा १ हजार ६७, नांदगांव ६४८, येवला ३२५, त्र्यंबकेश्वर २६५, सुरगाणा १७९, पेठ ८७, कळवण ४७४, बागलाण ९४८, इगतपुरी ४२०, मालेगांव ग्रामीण८३१ असे एकूण १० हजार ३७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९ हजार ७३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २७ तर जिल्ह्याबाहेरील २७८ असे एकूण ३२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ११ हजार ७८६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८३.०५ टक्के, नाशिक शहरात ८४.१५ टक्के, मालेगाव मध्ये ७६.२१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.४५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ४२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार २१४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २१६ व जिल्हा बाहेरील ८१ अशा एकूण २ हजार ५५३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख ११ हजार ७८६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ७६ हजार ८२३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३२ हजार ४१० पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)