नाशिक – कमी पटसंख्या असलेल्या ३०२ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. २० पेक्षा कमी संख्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या या शाळा आहेत. या विद्यार्थ्यांना शेजारील शाळेत सामावून घेतले जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. शाळा समायोजनाची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ३०२ तर राज्यात एकूण १५ हजार शाळा बंद केल्या जाणार आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश असे