नाशिक – मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र व बसवंत फळप्रक्रीया उद्योग हे शेतीपुरक उद्योगांचे खरोखरच आदर्शवत उदाहरण असून या माध्यमातून शेतकरी बांधवांना विकासाची एक नवी दिशा मिळत आहे, अशा शेतीपूरक उद्योगांना शासन स्तरावर पाठबळ देवून चालना देणार, असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
आज पिंपळगाव बसवंत येथे संजय पवार यांनी साकरलेले मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रीया उद्योग व आदर्श गाव सेवरगांव प्रतिकृती पाहणी दौऱ्याच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पुजा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीवपडवळ, उपविभागीय कृषी अधिकारीजी.डी. वाघ, तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील, निवासी नायब तहसिलदार कल्पना निकुंभ, निफाडचे पोलीस उपनिरिक्षक व्ही. बी.निकम, व्ही. के. राठोड, पोलीस उपनिरिक्षक पुंडलीक पावशे, मुधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक, संजय पवार, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.बी.बी.पवार आदी उपस्थित होते.










