– कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ पर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५८ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ६४५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५८४, चांदवड १ हजार ४०, सिन्नर ५७३, दिंडोरी ५१९, निफाड १ हजार ६७०, देवळा ८७१ , नांदगांव ५१५, येवला ३६४, त्र्यंबकेश्वर १६८, सुरगाणा १५२, पेठ ६१, कळवण ४१५, बागलाण १ हजार ८३, इगतपुरी ३७१, मालेगांव ग्रामीण ८३१ असे एकूण ९ हजार २१७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ९२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७९ तर जिल्ह्याबाहेरील २०८ असे एकूण २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ३०१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये ८२.७१ टक्के, नाशिक शहरात ८४.७८ टक्के, मालेगाव मध्ये ७६.६५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.८१ इतके आहे.
मृत्यू :
नाशिक ग्रामीण ९९० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १५८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २०६ व जिल्हा बाहेरील ७१ अशा एकूण २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ८९ हजार ३०१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ५८ हजार ६४५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २८ हजार २३१ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.८१ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)