नाशिक – जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील २४ धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला असून ही धरणे जवळपास भरली आहे. यातील १२ धरणे आेव्हरफ्लो झाली आहे. तर पाच धरणात ९० टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठी आहे. जिल्ह्यात मोठे धरण प्रकल्प सात असून मध्यम प्रकल्प हे १७ आहे. या सर्व धरणातील पाण्याची क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफुट आहे. यात सोमवारी ६१ हजार ९२४ दशलक्ष घनफुट साठा आहे, तो टक्केवारीत ९४ आहे.