नाशिक – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होवू नये म्हणून नागरिक व क्लासेस संचालकांच्या मागणीनुसार १५ जानेवारी पासून नववी ते बारावी पर्यंतचे खाजगी क्लासेस सुर करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. क्लासेस चालकांनी शासनाचे सुरक्षेविषयक मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
शासनाने ॲनलॉक जाहिर केल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून जिल्ह्यात सर्वच गोष्टी हळूहळू सुरु करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची कमी होतांना दिसत असून रुग्णसंख्या पंधराशे पेक्षा खाली आलेली आहे. जिल्ह्यातील मृत्युचे प्रमाण देखील कमी आहे. कोरोनाचा प्रादूर्भावाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात हळूहळू सर्व सुरु करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे नवीन वर्षात नववी व बारावीच्या शाळा देखील सुरु करण्यात आल्या आहेत.
शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० ते ८० टक्के असल्याने विद्यार्थ्यांचा देखील प्रतिसाद दिलासादायक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक पालकांची व क्लासेसच्या संचालकांची मागणीनुसार क्लासेस सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत असल्याचे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहिर केले आहे.
अनलॉक जाहिर झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने सगळे सुरु करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होवू नये,म्हणून शाळा,क्लासेस सुरु करणे हा शासनाच्या कर्तव्याचा भाग असल्याने क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.