नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक सुरू आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाने, डॉ.अनंत पवार, डॉ.प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकी अगोदर नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून भुजबळ यांच्याकडून जनजागृती
पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. त्यांनी सिडको परिसरातील रानाप्रताप चौक या ठिकाणाहून पाहणीस सुरवात करत उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको,शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालय या भागात पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलीप खैरे त्यांच्या समवेत उपस्थित होते. पाहणी दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडको, सीबीएस, शालिमार, मेन रोड येथे नागरिक, दुकानदार, हॉटेल, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधत मास्क वापरण्यासह कोरोनाच्या नियमनाचे पालन करण्याचे आवाहन केले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा पर्याय शिल्लक असल्याचे सांगत. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या