नाशिक – जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव घसरले. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितिमध्ये कांद्याच्या भावात क्विंटलमागे तब्बल ७०० रूपयांची घसरण झाली.
शनिवारी ३ हजार ८०० रूपये क्विंटल असलेला कांदा आज ३ हजार १०० रूपये क्विंटलने विकला गेला. ४८२ ट्रॅक्टरची प्रचंड आवक झाल्याने कांद्याचे भाव गडगडल्याचे बाजार सूत्रांनी सांगितले.
आज उन्हाळ कांद्याला १ हजार ते ३ हजार ६११, अर्थात सरासरी ३ हजार १०० रूपये तर लाल कांद्याला १ हजार ६०० ते ४ हजार, म्हणजे सरासरी ३ हजार ६०० रूपये क्विंटल असे भाव होते.
लासलगाव बाजार समितीच्या आवारातही उन्हाळ कांद्याचे भाव ७५०, तर लाल कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घसरले. आज लाल कांद्याला सरासरी ३ हजार ८०० तर उन्हाळ कांद्याला ४ हजार ४०० रुपये भाव मिळाला.