नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाने, डॉ.अनंत पवार, डॉ.प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांना दिली ही माहिती
-
आठ दिवसांचं अल्टीमेटम, आठ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास लॉकडाऊन जाहीर करणार
-
वारंवार आवाहन करूनही लोक ऐकत नसतील, तर लॉकडाऊन हाच पर्याय
-
२५ फेब्रुवारीला साधारणतः अडीच हजार रुग्ण
– आज एक महिन्यानंतर २५ मार्चला १९ हजार रुग्ण
– राज्याच्या रुग्णसंख्या वाढीत नाशिकचा ५ वा क्रमांक
-
एकट्या नाशिक महापालिका क्षेत्रात ११ हजारांहून अधिक रुग्ण
-
आमच्या वर्षी उच्चांकी रुग्णसंख्या साडे सोळा हजार आज 19 हजार इतकी उच्चांकी रुग्णसंख्या
-
जिल्ह्यात लसीकरणाची १५१ केंद्रे
-
लसीकरण वेगानं होण्यासाठी अधिक केंद्रांची मागणी केलीय
-
२१३८ ठिकाणी निर्बंधांचं उल्लंघन
-
सुविधा वाढवण्याचे महापालिकेचे प्रयत्न
-
कोरोनाची दुसरी लाट आलीय
-
होम क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या रुग्णांमुळे रुग्णसंख्या वाढली
-
या रुग्णांची पडताळणी पोलीस आणि पालिका प्रशासनाने करावी
-
होम क्वारंटाईनचं उल्लंघन होत असेल तर अशा रुग्णांना रुग्णालयात अॅडमिट करण्याच्या सूचना
-
नागरिक नियम पाळत नाही, याचं दुःख
-
लॉकडाऊनमुळे गरिबांचे हाल
-
बाजारात अनेक दुकानदार मास्क न लावता व्यवसाय करत आहेत.
-
मास्क न लावणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या दुकानदारांचं दुकान १ वर्षासाठी बंद करू
-
ग्राहकही विनामास्क दुकानात खरेदी करतात
-
नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना
-
विलगीकरणासाठी आता हॉस्पिटलसोबतचं हॉटेलचीही गरज
-
कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरणात राहत नसेल तर त्यांची माहिती शेजाऱ्यांनी पोलीस अथवा पालिका प्रशासनाला कळवावी
-
काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
-
सर्वांनी आपली जबाबदारी ओळखा, परिस्थिती सुधारल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही
-
रात्री ९ वाजता हॉटेल बंद झालीच पाहिजे