नाशिक – नाशिक जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेने महिला कर्मचा-यांसाठी आयोजित केलेल्या हळदी – कुंकू कार्यक्रमाला मराठी – हिंदी मालिकांमध्ये काम करणारी बालकलाकार केतकी कुलकर्णी हिने धमाल केली. या कार्यक्रमात वयाचा दहाव्या वर्षापासून टीव्ही सिरीयल मध्ये काम करण्यास सुरुवात केलेल्या केतकीने आपल्या एकुणची अभिनय प्रवासाची माहिती तिच्या छोटेखानी मुलाखतीतून दिली. ही मुलाखत सुजाता चौधरी यांनी घेतली.
यावेळी केतकीने आतापर्यंत स्मिता, शौर्य, लक्ष अशा अनेक मालिकांमध्ये काम केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे डीडी नॅशनल हिंदी वर सावित्रीबाई फुले यांच्या लहानपणाची भूमिका केल्याची माहिती तीने एका प्रश्नाला उत्तर देतांना दिली. सोनी मराठी वरील “हम बने तूम बने” या मालिकेत आगळी वेगळी शर्मीली म्हणून गेले दोन वर्ष करत असलेले काम, गणेशोत्सवात झालेल्या बिग बजेट प्रॉडक्शन ची “जय देवा श्री गणेशा” मध्ये देवी रिद्धीची भूमिक, राधा कृष्णा मध्ये उत्तरा म्हणून केलेली छोटी भूमिका याबद्दलही तीने माहिती दिली. यावेळी केतकीने तिला नृत्याची प्रचंड आवड असल्याचे सांगितले. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याकडून सुध्दा तीला पारितोषिक मिळाल्याची माहिती तीने दिली. डान्स विथ माधुरी on टाटा स्कायची छोटी जाहिरात सुध्दा केल्याचा किस्साही यावेळी सांगितला. मालिकांमधील काही डायलॅाग व एका गाण्यावर नृत्य सुध्दा या कार्यक्रमात केतकीने सादर केले.
या कार्यक्रमात सुरुवातील महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद नेसरिकर, जिल्हा निवडणूक अधिकारी थवील मॅडम, तहसिलदार रचना पवार, पल्लवी जगताप, राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप, उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संयोजन अरुण तांबे, मनोज सरवान, उत्मेश रत्नाकर, भरत राठोड, पी.वाय.देशपांडे, संजय शिंदे, तुषार नागरे, महिला प्रतिनिधी वंदना महाले, धनश्री कापडणीस, अर्चना गरुड, आश्विनी खर्डे, सरिता चव्हाण, शिल्पा धोडपकर, अकिला तडवी, सोनाली मंडलिक, पुनम नेरकर, प्रियंका मोहिते, मीना पठाडे, सुनीता पाटील, माधुरी रिपोटे, पूर्वा वाघ, प्रिती वाघ, उज्वला रोकडे, शितल गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास युनिक हेल्थकेअर अॅण्ड सर्व्हिसे प्रा. ली व रिलाययन्स निपोन लाईफ इन्शुरन्स कंपनी यांनी सहकार्य केले.
सांस्कृतिक कार्यक्रमही ठरला लक्षवेधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महसुल कर्मचारी तणावात होते. पण, प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महिला कर्मचा-यांसाठी असलेला पहिलाच कार्यक्रम लक्षवेधी ठरला. महिला कर्मचा-यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमात रंग भरला. या कार्यक्रमात वाण वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी बालकलाकार शौर्य रिपोटे यांनी नृत्य केले. अर्चना गरुड यांनी विविध गीते सादर केली.