नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रेवखंडे यांच्यासह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांनी केलेली विनंती मान्य केल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात ३७ तर शहरात ८ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाची साथ आटोक्यात आली असतांना दिवाळीनंतर पुन्हा प्रार्दुभाव सुरु झाल्याचेही ते म्हणाले.