नाशिक – महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्यावतीने नाशिक जिल्हा अध्यक्षपदी कलाशिक्षक संजय पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्री विरभद्र माध्यमिक विद्यालय, कोशिंबे येथे पवार कार्यरत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे मध्ये ते सक्रीय आहेत. त्यांनी आजपर्यंत कला शिक्षक व शिक्षक शिक्षकेत्तर यांच्या समस्यांसाठी अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. पवार हे उत्कृष्ट सायकलिस्ट, स्विमर, रनर, ट्रेकर आहेत. त्यांनी अनेक फुल व हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. ते शिक्षकांमध्ये एकमेव हाफ आयर्नमॅन आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यात अग्रेसर आहेत. सायकलचा प्रचार-प्रसार करण्यावर ते भर देत आहेत. या सर्व संघटनात्मक गोष्टींचा उपयोग मला होईल, असे पवार यांनी म्हटले आहे. सर्व संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सायकलिस्ट व स्पोर्ट परिवार यांच्याकडून पवार यांचे अभिनंदन होत आहे.
It’s really a good job which can give birth to new revolution. The continuous rise in the price of fuels are making our daily life a Grabbed one. Good job and plan of using Cycle in our Day to day life by Our beloved Sanjay Pawar Sir