नाशिक – मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या नाशिक जिल्हा आरोग्य देखरेख समितीवर धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी म्हणून नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी शशिकांत पारख यांची निवड झाल्याचे धर्मादाय सहआयुक्त झपाटे यांनी धर्मादाय रुग्णालय योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत बैठकीत जाहीर केले. शहरातील रुग्णालयांच्या संपर्कात राहून पारख यांनी रुग्णालयांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न थेट आपल्याकडे मांडावेत, असेही झपाटे यांनी सांगितले.