नाशिक – जनरल वैद्य नगर येथे पित्याने मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. शेतीवर आमचाच वाटा आहे व तुमचे विवाहबाहय संबध असल्याचे मुलाने सांगितल्यामुळे पित्याने हा खून केला. पहाटे चार वाजता ही घटना घडली. निलेश प्रभाकर माळवाड असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मुंबई नाका पोलिसांनी संशयित मारेकरी प्रभाकरला गजाआड केले आहे.
या घटननेची जयश्री प्रभाकर माळवाड यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून त्यास मुलगा निलेश याचा विरोध होता. यावरून दोघं पिता पुत्रात नेहमी वाद विवाद होत असत. निलेशला वडिलांनी यांनी दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याचे समजले. त्यामुळे त्याने शेतीवर दावा केला. त्यावेळी प्रभाकर यांनी निलेशला तू काही काम धंदा करत नाही असे बोलून वाद घातला. पण, मी मध्यस्ती करून वाद मिटवला. त्यानंतर आम्ही तिघे झोपलो. पण, पहाटे प्रभाकरने निलेशला गळा आवळून खून केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.