नाशिक – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक व ज्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया ज्या नाशिकमध्ये रोवला आणि संपूर्ण देशाला चित्रपटसृष्टीची ओळख करून दिली व त्यामुळेच संपूर्ण जगात बॉलीवुड सारखी चित्रपट सृष्टी ही दोन नंबरची चित्रपट सृष्टी म्हणून ओळख मिळाली असे चित्रपट सृष्टीचे निर्माते चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे.
दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी नाशिक असल्याने त्यांचा अमूल्य ठेवा व नाव चिरंतर स्मरणात राहावे आणि त्यांच्या योगदानाची ओळख संपूर्ण जगाला व्हावी. याकरिता नाशिक महानगरपालिकेने फाळके स्मारका सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केली. परंतु, फाळके स्मारक निर्मितीस बरेच वर्षाचा कालावधी लोटला असून दरम्यानच्या काळात त्या स्मारकास अवकळा आली. त्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी महापौरपदाच्या सुरुवातीच्या काळात फाळके स्मारकाला ७ फेब्रुवारी २०२० रोजी भेट देऊन नाशिक मधील चांगल्या प्रकारचे पर्यटन स्थळ होऊ शकते याकरिता तज्ञ माणसाचे मार्गदर्शनाखाली स्मारकाचा विकास करावा असे असे पाहणी दौरा प्रसंगी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या होत्या. तसेच फाळके स्मारक येथे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे बाबतही सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात पूर्णाकृती पुतळा उभारणे करिता पाच कोटी तसेच फाळके स्मारक व बुद्ध स्मारक याचे सुशोभीकरण करणेकामी दहा कोटीची तरतूद धरण्यात आल्याने चित्रपट महर्षी यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्या येणार आहे. यासाठी नशिककर नागरिकांचा, नाट्यकर्मी तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले कलाकार यांची सातत्याने मागणी होत असून पाठपुरावाही होत असल्याने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी २ डिसेंबर २०२० रोजी आयुक्त मनपा नाशिक तसेच शहर अभियंता यांना पत्र देऊन दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वीच हे काम तातडीने करण्याबाबत कळविले आहे.
दादासाहेब फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात उभारल्यास तसेच फाळके स्मारकाचे व बुद्ध स्मारकाचे सुशोभीकरण झाल्यास संपूर्ण भारतातून नाशिक तीर्थक्षेत्रास भेट देणारे भाविक व पर्यटक यांचा फाळके स्मारक पर्यटन केंद्रात ओघ वाढून नाशिक महानगर पालिकेला चांगल्या प्रकारे महसूलही जमा होऊन नाशिक महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे माननीय महापौर कुलकर्णी यांनी सांगितले आहे.