पहिली घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेज समोर घडली. याप्रकरणी संजय मुकुंदा वारघडे (रा. धारगाव, ता. इगतपुरी) याने फिर्याद दिली आहे. सोमवार (दि. ३०) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी संजय वारगडे व त्याचा मित्र अशोक लचके हे मोटारसायकलवरून मुंबई-आग्रा महामार्गाने द्वारकेकडून दहावा मैलकडे चालले होते. पत्ता विचारण्यासाठी त्यांनी के. के. वाघ कॉलेज समोर मोटारसायकल थांबली असता पाठिमागून मोटारसायकलवरून १९ ते २२ वयोगटातील दोन जण आले व त्यांनी अशोक लचके याच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास प्रतिकार केल्याने संशयितांनी चॉपरचा धाक दाखवून फिर्यादीस मारहाण व शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व त्याच्या मित्राचा असे दोन मोबाइल, दिडशे रुपयांची काढून घेत पळ काढला.
याच संशयितांनी थोडे अंतर पुढे जावून एका मालट्रक चालकास चॉपरचा धाक दाखवून लुट केली. याप्रकरणी दीपक शिवाजी पगार (रा. पळसे) याने फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ३०) सायंकाळी ४.५५ वाजता दीपक हा विटांची ट्रक क्र. (एमएच १४ सीपी २२२०) घेवून रस्त्याच्या कडेला उभा असताना दोन संशयित तेथे आले व त्यांनी दोन्ही बाजूंनी केबिनमध्ये चढून चालकास चॉपरचा धाक दाखवला. व दोन मोबाइल, पाकीटमध्ये असलेली १५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. मोटारसायकल चालक आणि ट्रक चालकास लुटणारे दोन्ही प्रकरणातील संशयित एक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक एस. सी. कासर्ले तपास करत आहे.
शहरातून तीन दुचाकी लंपास
नाशिक – शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी लंपास झाल्या आहेत. याप्रकरणी सोमवार (दि. ३०) रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी संजय हिरामण थोरात (रा. शालीमार) यांनी सरकारवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता थोरात यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ इएन २४१२) जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळा विभागाच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती, यावेळी अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. दुसर्या घटनेत विनयनगर येथील ताहिर अल्ताफ पठाण (रा. वडाळारोड) याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ताहिर पठाण याने त्याची मोटारसायकल क्र. (एमएच १५, जेबी ९३८०) प्रभु अपार्टमेंट, विनयनगर येथे पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. त्यामुळे डिकीत ठेवलेले ओळखपत्र, गाडीचे कागदपत्र देखील चोरीला गेली. तिसरी घटना, इदगाह मैदान परिसरात घडली. निलेश धनगर (रा. जुने नाशिक) यांनी २८ नोव्हेंबर रोजी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ झेड ७९८१) राजदूत हॉटेलच्या पाठिमागे, इदगाह मैदानात उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरून नेली.
………
तडीपार जेरबंद
नाशिक – हद्दपारीचे आदेश असताना कोणतीही पुर्वपरवानगी न घेत शहरात वास्तव्य करणार्यास सराईत तडीपारास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोबीन तन्वीर कादरी उर्फ मुन्ना खान (रा. उपेंद्र नगर) असे संशयिताचे नाव आहे. कादरी यास २३ जुन २०२० पासून एका वर्षाकरिता शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र तरीही तो शहरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
नाशिक – चाकूचा धाक दाखवून एकाच्या खिशातून पंधरा हजार रुपयांची रक्कम काढून घेत संशयितांनी रिक्षात बसून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ३०) दत्तमंदिर चौक परिसरात घडली. याप्रकरणी संतोष सुखदेव लांडे (रा. कुरुल, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी संतोेष लांडे हे नाशिक-पुणे मार्गावर दत्तमंदिराजवळ असतांना दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले चाकूचा धाक दाखवून संतोष यांच्या पाकीटातून १५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. व काळ्या रंगाच्या रिक्षात बसून पळून गेले. याप्रकरणी पनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक ए. बी. पाटील अधिक तपास करत आहे.
………….
मंगळसुत्र लंपास
नाशिक – भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गेलेल्या महिलेल्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र अज्ञात महिलांनी चोरून नेल्याचा प्रकार सोमवार (दि. ३०) सायंकाळी देवळाली गावात घडला. याप्रकरणी सुशिला रुपसिंग तोमर (रा. जय भवानी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुशिला तोमर या भाजीपाला खरेदीसाठी देवळाली गावात गेल्या होत्या. यावेळी तीन अज्ञात महिलांनी तोमर यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…………….