नाशिक : चांदी विक्री प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चोरट्याने दोन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून चांदी मुकूटाच्या तुकड्यासह ऑक्सिजन सिलेंडर आणि गुह्यात वापरलेला थ्री व्हिलर टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
सुरेश विष्णू गुरकुले (२० रा.हिवरे ता.सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून करीम महंमद बेग (३२ रा.गामणे मळा,कर्मा हाईटस जवळ) हा त्याचा साथीदार अद्याप पसार आहे. सोमवारी (दि.१६) युनिट १ चे कर्मचारी विशाल काठे आणि विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सीबीएस परिसरात एक इसम चांदी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावला होता. संशयीत सीबीएस भागात येताच पोलीसांनी त्यास बेड्या ठोकल्या. अंगझडतीत त्याच्याकडे चांदीच्या मुकूटाचे ११ तुकडे मिळून आले.
पोलीस तपासात त्याने करीम बेग नामक साथीदाराच्या मदतीने डिसेंबर २०२० मध्ये चेतनानगर येथील म्हाडा कॉलनीत केलेल्या घरफोडीत देवाचा मुकूट चोरल्याचे सांगितले. अधिक तपासात त्याने शिंगाडा तलाव भागातही गेल्या शुक्रवारी (दि.१२) गॅसच्या दुकानात घरफोडी केल्याची कबुली दिली. करीम बेग या साथीदाराने लेखानगर येथील भगतसिंग झोपडपट्टीतील एका घराच्या आडोशाला मुद्देमालाने भरलेला थ्री व्हिलर टेम्पो उभा केलेला असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी खातरजमा केली असता चांदीसह पाच सिलेंडर असलेला थ्री व्हिलर टेम्पो जप्त केला.
संशयीताचा साथीदार अद्याप फरार असून त्याच्या अटकेने इंदिरानगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीचा उलगडा झाला आहे. संशयीतास इंदिरानगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,रघुनाथ शेगर,दिनेश खैरणार,उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे,अंमलदार काळू बेंडकुळे,विजय गवांदे,रविंद्र बागुल,वसंत पांडव,अनिल दिघोळे,संजय मुळक,येवाजी महाले,प्रविण कोकाटे,विशाल काठे,आसिफ तांबोळी,शांताराम महाले,प्रविण वाघमारे,रावजी मगर,फय्याज सय्यद,मोतीराम चव्हाण,मनोज डोंगरे,राजेंद्र लोखंडे,संतोष कोरडे,योगीराज गायकवाड,विशाल देवरे,निलेश भोईर,राहूल पालखेडे,प्रविण चव्हाण,मुक्तार शेख,गौरव खांडरे,राम बर्डे,गणेश वडजे,समाधान पवार,प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.