नाशिक : घरासमोर वाहन पार्क केल्याचा जाब विचारल्याने कुटूंबियांनी दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोड भागात घडली. या घटनेत दगडफेक करण्यात आल्याने दोघे भाऊ जखमी झाले असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सुरेश गवळी,विशाल सुरेश गवळी,सुरेश नागप्पा गवळी व शोभा सुरेश गवळी (रा. सर्व गवळीवाडा,खोलेमळा) अशी दोघा भावांना मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी भागवत उमाजी औशीकर (रा.गवळीवाडा,खोलेमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. औशीकर मंगळवारी (दि.३) रात्री आपल्या गुरा जनावरांना चारापाणी करीत असतांना ही घटना घडली. याचवेळी महेश व विशाल गवळी चार चाकीतून आले. त्यांनी आपले वाहन औशीकर यांचे नातेवाई अशोक झिपरे यांच्या दारासमोर पार्क केले. यावेळी झिपरे यांनी गवळी कुटूंबियांना जाब विचारला असता संशयीतांनी शिवीगाळ करीत सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून औशीकर व त्यांच्या भावास मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्याने दगडफेक केल्याने औशीकर बंधू जखमी झाले अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.